ब्लॉगिंग कट्टासामाजिक कट्टा

वाचवा आपल्या मातृभाषेला

 काही दिवसापूर्वी माझी सगळयात लहान बहीण काही दिवसाच्या सूट्टया साठी आपल्या माहेरी आली ..आमच्यात जास्त बोलणे होत नाही मोजकेच बोलतो पण महत्वाचे..बोलता बोलता तिने सांगितले की ती ज्या कंपनी मध्ये मुंबई मध्ये नौकरी करत आहे त्या कंपनी मध्ये मराठी बोलत नाहीत,दुसऱ्या राज्यातून आपल्या येथे कामानिमित्त आलेले आणि येथेच राहत असलेले दोन व्यक्ती मिटिंग मध्ये सुध्दा त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात..आणि नंतर हिंदी मध्ये सांगतात जर काय काम असेल तर..म्हणजे संवाद ते त्यांच्या भाषेत करतात..

कोणत्या भाषेत बोलायच ते ठरवतील यात काय वाद नाही पण जेव्हा मराठी माणूस समोर असतो तेव्हा इतर भाषेमध्ये संवाद कशासाठी ,जर इतर राज्यात कंपनी असेल तर ठिक आहे तुम्ही त्या राज्यातील भाषा बोलली तर ,पण महाराष्टात येउन मराठी भाषा बोलत नाही म्हणजे याचा अर्थ आपण त्यांना दिलेले जास्तीचे स्वातंत्र्य ,कालच्या लेखामध्ये आम्ही भारतीय या वर मी जोर दिलता ,ते बरोबर आहे पण याचा अर्थ आमच्या वर इतर भाषा तूम्ही लादण्याचा तूम्हाला काहीही अधिकार नाही..

 आज लोकसत्ताचे संपादकीय पान वाचत असताना एका लेखा मधली बातमी वाचली की मराठी पाट्या दुकानावर अजून लावल्या गेल्या नाहीत..शासनाने आदेश दिला होता की तूम्ही ३१ मे पर्यंत मराठी पाटया लावल्या पाहिजे ..पण कोणीही याची दखल घेतली नाही .शेवटी सरकारने तारीख वाढवली ३१ सप्टेबंर पर्यंत पाटया लावून घ्या .. म्हणजे यांना धाक राहिला नाही किंवा सरकारने कारवाई चालू केल्यावर लावतील किंवा राज ठाकरे साहेबांसारखे कायदा हातात घेतील तेव्हा यांना समज येईल…

दुसरी गोष्ट अशी की खूप जणांकडून ऐकण्यात आले आहे की मुंबई मध्ये इतर राज्यातून आलेल्या लोकांच्या कॉलण्या तयार झाल्या आहेत ..ही खूप धोक्याची घंटा आहे..कारण जर अशा कॉलन्यांची संख्या वाढली तर एक दिवस  असा होईल की मुंबई महानगरापालिकेमध्ये नगरसेवक मराठी नसतील इतर राज्यातील आलेले आणि येथे राहत असलेले होतील..महाराष्ट्राचे रहवासी प्रमाणपत्र काढून..

 मग काय आज मुंबई ,नंतर ठाणे,नंतर बाकीचा कोकण याचा अर्थ ही गोष्ट वाटती तेवढी आपण हलक्यात घेत आहोत एक दिवस मुंबई ठाणे नंतर इतर भागामध्ये आपले मराठी लोकं कमी दिसतील..

 जरी आपण भारतीय असलो तरीही आपल कर्तव्य आहे की आपल्या राज्यामध्ये आपण मराठीच बोलले पाहिजे ..फक्त पत्रकारिता मराठी मधून करून चालणार नाही,उठता बसता आणि समोरच्याला ही मराठीत बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे.

 शालेमध्ये इंग्रजीला महत्व दिले ,नौकरी करताना आता इतर भाषेला महत्व दिले तर आपल्या भाषेला महत्व कधी देणार..

त्या दिवशी पूण्या मध्ये फिरलो तर काही दुकानादार गांधी टोपी घातली होती पण हिंदी मध्ये संवाद केला माझ्याशी ,सूरूवातीला कोणीही भेटले की इतर भाषेमध्ये बोलायला चालू केले त्याने ..अरे काय किंमत आहे का नाही मराठी भाषेला..

अगोदर आपल्या लोकांनी इतर भाषा बोलणे बंद करा..,

 महाराष्टामध्ये जे उद्योग करतात,महाराष्टामध्ये जे नौकरी करतात,महाराष्ट्रामध्ये जे राहण्यासाठी येतात त्यांना मराठी बोलता आलेच पाहिजे.

जर आज आपण आवाज उठवला नाहीतर एक ना एक दिवस इतर राज्यातील लोकांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि एक दिवस राजकारणामध्ये त्यांची प्रमुख भुमिका राहील,आणि नगरसेवक,महापौर त्यांचे बधायला मिळतील

 मराठी भाषा दिनाच्या दिवशी मराठीत संवाद साधून जमणार नाही,मैदानात उतरा आणि आपली भाषा अभिमानाने बोला,खेडयातील भाषा असो,‍किंवा शहरातील भाषा असो ,बिनधासत बोला ..पण इतर भाषा महाराष्ट्रात राहून तरी बोलू नका..

 रेल्वे मधून प्रवास करताना एक व्यक्ती माझ्या समोर येउन बसला,दूसरा पण आला आणि  इतर भाषेमध्ये बोलू लागला ,दुसरा व्यक्ती पण त्याला त्याच भाषेत बोलू लागले ,काही वेळा नंतर एका व्यक्ती ने वडापाव खाण्यासाठी विक्रेत्याला हाक दिली, वडापाव कितीला आहेत ,हे येकून दुसरा व्यक्ती ने विचारल अरे तूम्ही कुठले तर तो म्हंटला अरे मी पालघर चा..दुसरा व्यक्ती म्हंटला मी पुण्याचा ..याला काय म्हणायचं

 लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!