जॉब कट्टामनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

श्रीमंतच काही गरीब लोकांचा जगण्याचा आधार…

श्रीमंत माणसात खूप अहंकार असतो, श्रीमंत लोकांचा गरीबाकडे बघण्याचा दष्टीकोन चांगला नसतो,श्रीमंत लोक गरीब लोकांचा अपमान करतात वगैरे वगेरे अशा काही बातम्या कानावर येत असतात ,यात काय खरे आहे किंवा खरे नसेल त्यात न पडता मी एका वेगळया नजरेने श्रीमंत लोकाकडे बघतो.

नेहमी प्रमाणे मी आश्रम मध्ये मनन करत बसलो , काही वेळानंतर मी मुत्रविसर्जन करण्यासाठी बाहेर आलो आणि माझे लक्ष गेले ,आश्रम मध्ये चालू असलेल्या बांधकामा कडे, स्वामी विवेकांनद महाराज, आणि रामकृष्ण तसेच मॉ शारदा देवी यांचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच प्रवचन करण्यासाठी ,लोकांना देवाशी एकरूप होण्यासाठी , शांत परिसरामध्ये मनन करण्यासाठी ,चिंतन करण्यासाठी मंदिराचे बांधकाम त्या परिसरामध्ये चालू होते..

आज जवळपास १५ ते २० जण त्या परिसरामध्ये काम करण्यासाठी आले होते, कोणाला फॅब्रीकेशन चे ,कोणाला तारेचे कुंपन करण्याचे काम, तर कुणाला विटा उचलण्याचे काम, कोणाला मिस्त्रीचे काम, तर कोणाला सेन्ट्रींग चे काम मिळाले होते..काही जणांना आता फरशी बसवण्याचे काम मिळेल, काही जणांना ग्रॅनाईट चे काम मिळेल, काही जणांना लाईट फिटींग चे काम मिळेल, तर काही जणांना सुतार काम मिळेल, काही जणांना रंग देण्याचे काम मिळेल , काही जणांना इतर फर्निचर चे काम मिळेल, काही जणांना मुर्ती बनवण्याचे काम मिळेल , काही वेगवेगळया कारागीरांना काम मिळेल..हे सर्व घडत आहे काही जणांच्या इच्छे मुळे..

म्हणजे काही श्रीमंत व्यक्तीच्या मनामध्ये अशी कल्पना आली की आपण असे असे मंदीर बनवायला पाहिजे ,आणि त्याचा अमल करण्यात आला अशाच काही श्रीमंत व्यक्तीच्या ईच्छेमुळे..

म्हणजे श्रीमंत व्यक्तींनी स्वप्न बघितले ,आणि त्याचा फायदा होत आहे काही गरीब लोकांना, काही छोट्या उद्योगांना, काही श्रीमंत व्यक्तींना सुध्दा…पण जास्त कोणाला फायदा झाला असेल तर गरीब लोकांना .

हाताला काम मिळणे हे काही जणांसाठी खूप मोठी गोष्ट आहे..आजच्या कामावर त्यांच्या घरात स्वयंपाक बनेल का नाही हे आजचे काम ठरवत असते.

मग अशा श्रीमंत लोकांच्या ईच्छेमुळे हाताला काम मिळते..श्रीमंत लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि एका बाजूला त्यांच्या स्वप्नामुळे या गरीब लोकांच्या हाताला काम मिळते..

अर्थव्यवस्था तर सगळयामुळे चालत आहे पण जास्त जर अर्थव्यवस्था चालवायला मदत करत असतील तर ते म्हणजे श्रीमंत लोक..कारण ते रोजगार निर्माण करत आहेत..

काही अशे पण लोक आहेत की बँकेंत खूप पैसा आहे पण तरी पण त्यांची ईच्छा असते की अजून खूप पैसा कमवण्याची मग काय वेगवेगळया शहरात करतात गुंतवणूक..मग काही जण मॉल वगैरे चालू करतात, काही जण हॉटेल चालू करतात, काही जण रिअल ईस्टेट मध्ये गुतंवणूक करतात,काही जण बँक चालू करतात, काही जण मल्टीप्लेक्स चालू करतात, काही जण वेगवेगळया श्रेत्रात गुंतवणूक करतात…या गुंतवणूकीचा फायदा होतो आपल्या सारख्या सामान्य गरीब लोकांना..आपल्या हाताला काम मिळते, आपल्या भाकरीची सोय होते, आपल्याला जगण्याचा एक मार्ग सापडतो, आपले घर चालते ..

जेवढे जास्त श्रीमंत लोक स्वप्न बघतील तेवढा जास्त रोजगार तयार होईल आणि हाताला काम मिळेल..

जेवढे जास्त जण लवकरात लवकरात जीवनात यशस्वी होतील तेवढा फायदा सामान्य माणसांना होत राहील..

आज जर श्रीमंत लोकांनी पैसा किंवा गुंतवणूक केलीच नाहीत तर वेगवेगळया संधी आपल्या साठी खूल्या होणार नाहीत..

त्यांनी स्वप्न बघायचे सोडले, आपण स्वप्ने बघितले नाही तर नवीन नवीन शोध कसे लागतील..

सांगण्याचा तात्पर्य की जेवढे तूम्ही तूमच्या ईच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार तेवढा इतर लोकांना त्याचा फायदा होत राहणार..

श्रीमंत माणसे स्वप्न बघतीलच आणि आपण पण लवकरात लवकर श्रीमंत होउन ,प्रत्येक ईच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे..जेवढे जास्त स्वप्न तूम्ही बघणार तेवढा जास्त फायदा सामान्य माणसांना होणार ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!