सामाजिक कट्टा

(real estate) हक्कसोडपत्र कसे घायचे…आपली प्रोपर्टी कशी शाबूत ठेवायचे.. यावर कोणाचा अधिकार असतो.. जाणून घ्या

real estate

(real estate) मित्रांनो, हक़्क़सोडपत्र म्हणजे काय ? ते कसे असावे आणि कसे बनवायला हवे त्या बद्दल आज आपण अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी कोणते नियम व अटी आहेत हे पाणार आहोत. पहिला आपण हक्कसोडपत्र म्हणजे काय आहे हे सोप्या पद्दतीने समजून घेऊयात. एकत्र कुटुंबा मधील कोणत्याही एका सदस्याने त्याच्या एकत्र कुटुंबामधून मिळणाऱ्या,

मिळकतीवरचा अथवा वैयक्तिक हिस्सा स्वइच्छेने देणे अथवा त्याच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या लाभासाठी कायमस्वरूपी सोडून देणे व नावावर करणे याला हक्कसोडपत्र असे म्हनतात. हा सगळा प्रकार तोंडी नसून कागदी स्वरुपात असतो. हे फक्त वारसहक्काने किंवा वारासादिकाराने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील,(real estate)

👉Cotton : कापूस दरातील तेजी पुन्हा परतणार? असा असणार भा👈

स्वताच्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते करता येऊ शकते. हक्कसोडपत्र हे एकत्र कुटुंबामधील सदस्य मग स्त्री असो पुरुष किंवा सहहिस्सेदार कुणालाही करता येत. एक गोष्ट इथे समजून घ्यायला हवी आहे. ती म्हणजे हे एकत्र कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीच्या नावे करता येत नाही. बाहेरचा व्यक्ती यामध्ये शामिल होऊ शकत नाही.

हक्कसोडपत्र करायला मोबदला केला जात नाही. हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या लाभासाठी केल जात असल्याने त्यासाठी मुद्रांक शुल्क आकारल जात नाही. मात्र त्याची नोंदणी केली जाते असल्या कारणाने त्यावर नोंदणी शुल्क आकारले जात. नोंदणीकृत असलेले हक्कसोडपत्रच ग्राह्य धरल जात. अथवा ते गैर मानले जाते.

👉बातमी कामाची! आधारमध्ये ‘या’ पद्धतीने बदला आपली जन्मतारीख, ते पण आपल्या मोबाईलव👈

आता आपण जाणून घेऊयात हक्कसोडपत्र कसे करावे ? एकत्र कुटुंबामधील जर एखाद्या सदस्याला आपल्या मिळकती वरचा हिस्सा आपल्याच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या लाभासाठी सोडायचा आहे. त्यांचे सहमतीपत्र साधारणता २०० रुपयांच्या मुद्रांकपत्रावर लेखी असावे. त्यामध्ये पुढील नोंदी असाव्यात. ह्या पत्राची नोंदणी तोंडी किंवा लेखी असू शकते,

पण तोंडी सिद्ध करणे अवघड असते म्हणून लेखी होणे आवश्यक असते. हक्कसोडपत्र म्हणजे दान / बक्षीस पत्र हक्कसोडपत्रामुळे हक़्क़ाच हस्तांतरण होणे. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२३ असे नोंदणी करावी लागते. नोंदणी अदिनियम १९०८ कलम १७ अथवा स्थावर मालमत्तेचे दोन लेख यांची नोंद करणे आवश्यक आहे.

👉शेती : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?👈

हे दस्त जाणकार वकीला कडून करून घेणे. हक्कसोडपत्र बनवताना लिहून देणाऱ्याचे नाव, त्याचे वय, पत्ता, व्यवसाय याबाबतचा माहिती त्यामध्ये असावा. त्यानंतर एकत्र कुटुंबातील सर्व शाखांची वंशावळ एकत्र कुटुंबामधील सर्व मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण अशा गोष्टी लागतात. या सोबतच हा दस्ताऐवज लिहून घेतेवेळी दोन साक्षीदारांची गरज लागते.

दस्तऐवजावर साक्षीदारांची नाव, पत्ता, व्यवसाय याबाबतचा तपशील आणि स्वाक्षरी अशा गोष्टी नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात. अशा प्रकारे हक्कसोडपत्र तयार झाल्यावर तलाठ्याकडे जमा करावे. हक्कसोडपत्र नोंदणीकृत करून दिल्यावर दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकती मधील हक़्क़ संपतो आणि लिहून घेणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीवर मालकी हिस्सा प्राप्त होतो.(real estate)

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!