सामाजिक कट्टा

Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान, पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत पुढील योजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही बोलावली आहे. सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यांनी खास प्लान तयार केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहेत.

राज्यात सुरु असलेले राजकीय संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तातडीची बैठक बोलावली आहे. 16 आमदारांच्या निलंबनानंतरच्या परिस्थितीवर पुढील नियोजन करण्यासाठी पक्षप्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे पक्षाच्या दिग्गजांची बैठक बोलावली आहे.Political Crisis

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!