मनोगतसंपादकीयसामाजिक कट्टा

खिशात नाही दमडी आणि प्रेमात आघाडी !!

 प्रेम या शब्दाने एकतर रंग आयुष्यात भरला जातो..नाहीतर प्रेमात रंग आयुष्याचा  उडुन जातो..अशाच प्रकारच्या काही घटना आजूबाजूला घडत आहेत..आपली तरूण पिढी यामध्ये पूर्णपणे फसली आहे..काही जणांना वाटते की प्रेम केले नाही तरूण वयात तर ते कसले आयुष्य . मुलींच्या प्रेमात नाही पडला म्हणजे तू काय आयुष्य जगलास..अशी टोमणे सुध्दा काही जण मारत असतात..

 आसपासच्या घटना बघून तरूण मुलांना पण वाटते की आपल्या आयुष्यात पण आपल्यावर प्रेम करणारी असायला हवी..मग एकीकडे नौकरी साठी रात्रदिवस एक करून अभ्यास करावा लागतो,तो अभ्यास चालू असताना आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम एवढा होतो की अभ्यास करण्याच्या मनात सुध्दा कधी कधी असा विषय येतो की आपण ही प्रेमात पडायला हवे,आपण ही रात्रभर कोणाशी तरी बोलत बसायला हवे,आपण ही सगळया गोष्टी करायला हव्या जे आता बाकीचे करत आहेत..किती तरी लाखाच्या आसपास विद्यार्थी नौकरी शोधायच्या प्रयत्नात आहेत..सरकारी नौकरी मिळणे आजच्या घडी ला सोपे राहिले नाही.त्यात अभ्यास करत असताना अचानक अशा प्रकारचे विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनात येणे म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत पोहचायला अजून वेळ लागणे किंवा असे पण होउ शकते की त्याला या विषयात लक्ष घातल्यामुळे त्याला आपल्या आयुष्यातील ध्येय तो गाठू शकणार नाही..यामध्येच अडकून राहू शकतो.

काही जणांना प्रेमात पडल्यावर फायदा पण होतो पण अशा घटना कमीच आहेत..

एक मित्र आहे ,त्याने पदवी पूर्ण केली आणि स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला लागला..अभ्यास चालू होता,३ ते ४ वेळेपेक्षा त्याने जास्त वेळेस परिक्षा दिली असेल तरीही नौकरी लागली नाही,जर वेळेस तो परिक्षा नापास होत असे,असाच अभ्यास चालू ठेवला ,अभ्यास चालू असताना तो प्रेमात पडला ,त्या मुलीचे त्याला दररोज  कॉल येतात,हा पण दररोज त्या मुलीला कॉल करतो,कमीत कमीत दिवसातून  ते ३ ते ४ घंटे एकमेकांना बोलतात,अभ्यासामध्ये त्याचे लक्ष लागत नाही ,वय वाढले आहे,नौकरी चा ताण आहे,खिशात पैसा नाही,मूलगी लग्न करायच म्हणत आहे,पण याला नौकरी नसल्यामुळे लग्न हा करू शक्त नाही..

परिक्षा जवळ आली आहे ,याचा कसलाच अभ्यास नाही,हा  पूर्णपणे प्रेमात बुडला आहे..

आता प्रेम केले आहे म्हणजे एकमेकांना भेटण्याची इच्छा तर होणारच..मग अशा जोडप्यासाठी भेटण्यासाठी कॅफे आहेत ,त्या ठिकाणी जाउन तासनतास ते गप्पा मारू शकतात,प्रेम करू शकतात,मग काय अशा कॅफे चे तासाला दर ठरलेले आहेत..एका तासाला १५० रूपये ,खूपच ओळखीचा असेल तर तासाला १०० रूपये ..मग जवळ असलेल्या पैशातून एकदा दोनदा तो त्या कॅफे वर लागणारा खर्च सव्त: च्या खिशातून करतो..काही दिवसांनी अजून यांची इच्छा होते भेटण्याची,पण खिशात आता जवळ पैसे नसतात,मग काय मित्राकडून उसने घेउन त्या मूली बरोबर तो कॅफे मध्ये जातो,काही तास बसतात,प्रेमाच्या ,करिअर च्या ,लग्नाच्या गोष्टी बोलून ,शारिरीक सुखाचा आनंद घेउन हे त्या कॅफे मधून बाहेर पडतात..परत अजून काही दिवसांनी भेटायचे ठरते,परत पैशाची चनचन ,मग दुसऱ्या मित्राकडून पैसे मागून यावेळेस पण हा कॅफे मध्ये जातो, परत काही दिवसांनी हे ठरवतात भेटायचे,परत उधारी परत कॅफे,परत उधारी,परत  कॅफे.घेतलेले मित्राचे पैसे जसे जमेल तसे हा देत राहतो ,असे करत करत परिक्षा तोंडावर आलेली असते..अभ्यास तर काहीच झालेला नसतो..मग काय परीक्षा दयायची म्हणून दयायची आणि मनातल्या मनात पूढच्या वेळेस चांगला अभ्यास करून देईन असे स्वत:ची समजूत काढायची ..आणि मग काय वय संपत आले आहे ,मुलगी तर लग्न करायच म्हणत आहे..याच विचारात हा पूर्ण दिवस घालवतो..

दुसरा मित्र असाच आहे ,काल परवा त्याला एक मुलगी हो म्हंटली ,सरकार स्थिर नसल्यामुळे पोलीस भरती होण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून याने एका मूलीला आपल्या मनातले बोलून टाकले आणि ती हो पण म्हंटली ..मग काय आता जस पहिल्या मित्राच्या बाबतीत झाले तसे याच्या बाबतीत होउ नये हीच देवाकडे प्रार्थना..

सांगायच तात्पर्य की जेव्हा आपण ध्येय ठरवतो,त्या दिशेने रणनीती ठरवतो,मग अशा गोष्टी ध्येय गाठल्यानंतर केल्या तर तूमचे ध्येय लवकारात लवकर तूम्ही गाठू शकणार..पण तरूण मुलांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे प्रत्येक जण अभ्यास करताना प्रेमात पडत आहे,मूलीशी गप्पा मारत आपला वेळ घालवत आहे,दिवसातले कमीत कमीत २ ते ३ तास बोलत बसणे,परत चॅटींग करत २ ते ३ तास घालवत आहे..यामुळे काय होईल तुम्हाल शारिरीक सुख मिळेल ,मानसिक सुख पण मिळेल ,पण तूमचे घ्येय तूमच्या पासून दूर गेलेले असेल..कारण प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे.यास्पर्धेत टिकायच म्हंटले की पूर्ण झोकून अभ्यास करावा लागेल..तूम्हाल मिरिट मध्येच यावे लागेल..त्यासाठी तुमचा पूर्ण बाजूंनी विकास होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच मुलीच्या प्रेमात पडण्यापेक्षा पुस्तकाच्या प्रेमात पडणे तूमच्या करिअर साठी चांगले राहील..

मुलीच्या आता प्रेमात न पडला तर काय फायदे होतील

वेळ वाचेल

आर्थिक नुकसान नाही होणार

मन स्थिर राहील

घ्येय लवकर गाठता येईल

अभ्यासात लक्ष लागेल..

कर्जबाजारी तूम्ही नाहीत होणार

आयुष्यातील पूर्ण होतील

अपवाद : काही जण प्रेम करून पण आयुष्यात यश प्राप्त करतात ..पण क्वचितच अशी घटना आजूबाजूला पाहण्यास आपल्याला भेटेल..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

One Comment

  1. महेश गाडे , प्रमोद, सचिन, प्रसाद, आकाश says:

    या लेखात खरी वस्तुस्थिती मांडली आहे लेखकाने.
    तरुणांनी काही गोष्टी लक्ष्यात घ्यावेत, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे हे समजले पाहिजे.
    योग्य धेय निश्चित करून त्या दिशेने गेले पाहिजे, काही निर्थक गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!