सामाजिक कट्टा

मिसमँच

मिसमँच हा शब्द लग्न,विवाह ह्या संदर्भात मला येथे नमुद करावासा वाटतो व त्या संर्दभात जे काही चांगले वाईट अनुभव आलेत ते लिहावे असे बरेच दिवसापासुन मनात विचार येत होता.
लग्न करतांना पत्रिका, गुण, रक्त गट, गण, गोत्र आणी काय काय नाही पाहील जात. काही ठिकाणी मुला, मुलीची पसंती असते परंतु केवळ पत्रिका जमत नाही म्हणून विवाह केला जात नाही. पत्रिका जमत असेल तरच विवाह निश्चित केला जातो. पण एवढ सगळ करुन खरोखर ते त्याच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत का ? त्यांचा संसार सुरळीत चालला आहे का ? त्याचे कायम खटके उडतात का ? का त्याच्यात कायम वाद विवाद, भांडण, तंडा, अबोला, रुसवे, फुकवे हे प्रकार त्यांचा संसारात होता का ? असे असंख्य प्रश्र माझ्या मनाला कायम पडतात.

जोडा कसा लक्ष्मी-नारायणा सारखा दिसतो! दोघ कसे एकमेका साठीच आहेत. लग्नाच्या जोड्या या स्वर्गात ठरतात. वगैरे,वगैरे लोक म्हणत असतात. ज्याच्या पत्रिका पाहून 36 गुण जुळवून देखील ते संसारात आनंदी आहेत का? तर त्याचे उत्तर निश्चीतच नकारार्थी येईल. कारण या जगात परिपुर्ण कोणीच नाही, सर्वगुणसंपन्न देखील कोणी नाही. तसा जर कोणी दावा करत असेल तर ते धादांत खोटे आहे. जर दोघांचे सर्वगुण जमत नाही. तर मग सुखाने संसार तरी कसा करतील ? संसार करतांना जुळवून घेणे, माघार घेणे, त्याग करणे व आपल्या माणसावर प्रेम करायला लागले की त्याच्यातील अवगुण आपोआप नाहिसे व्हायला लागतात. आणी मग एकमेकांचे दोष हि झाकले जातात.
या सारख्या गोष्टी मुळे मिसमाँच जोडपीही गुण्यागोविंदाने नांदतात व सुखी संसार करतात.
एकदा मनाने ठरवेले की आपल्या जोडीदाराला सांभाळून घ्यायचे तर आपोआप प्रेम वाढते. मग त्यातील गुणदोष दिसत नाही. पण इथपर्यंत यायला मनाचा फार मोठेपणा लागतो तो एकदा आला की सुखीसंसाराची गुरुकिल्ली मीळाल्याचा आनंद मिळेल. आपले सर्वस्वी आपल्या जोडीदाराशी समर्पित, एकरूप करीत नाही तो पर्यंत तो क्षण येणार नाही. कारण या जगात परीपूर्ण असा कोणीही नाही.

मी बरीच अशी जोडपी पाहीली आहेत की. संसार होवून 25, 30, 35 वर्ष झालीत पण अजुनही त्याच्या संसाराचा सुर जुळला नाही. सुना आल्यात,जावाई आले,नातू, पंतु झालेत पण दोघही नवरा बायको एकमेकाच्या तक्रारी करतांना दिसतात व कायम भांडताना दिसतात. काही जोडपी अशीही की बायको नवर्याला मारतांना पाहिले आहे. आपण जर त्याच्यात मध्यस्थी करायला गेलो तर, आमच्या नवरा बायकोचा वाद आहे त्यात तुम्ही पडू नका असे म्हणायचे.

काही जोडपी अशीही पाहीली दोघ नवरा बायको रिक्षात बसले तर ज्याने त्यानी ज्याचे त्याचे रिक्षाचे पैसे द्यायचे, काही जोडपी अशीही आहेत की नवर्याने कितीही व्यभीचार, अत्याचार करो बायको त्याला पाठीशीच घालणार, नवर्याने मारुन बाहेर काढून दिलेले पाहीलेत ती माऊली रात्रभर पावसात भिजत दरवाजाशी बसुन राहीली, काही असेही आहेत की नवर्याने अक्षरशः बायकोला लाथानी मारतांना पाहीले आहे. अगतीक असह्य पणे पाहण्या पलीकडे आपण काहीच करु शकत नव्हतो. एका नवर्याने दारुच्या नशेत आपल्या पत्नीचे लांबसडक केस रात्री झोपेत कापुन टाकले सकाळी उठून पहाते तर आपले सुंदर, आकर्षक केस कापले गेले. त्या माऊलीचा राग अनावर झाला, संध्याकाळी नवरा घरी आल्यावर. त्या माऊलीने काय करावे दरवाज्याला आतुन कडी लावली टेपचा आवाज मोठा केला आणी खराटा घेवुन तोंडापासुन ते पाया पर्यंत पुरा सोलून काढला.
आणी विषेश म्हणजे त्या लांब सडक केसावर भाळून महाशयांनी तिच्याशी लग्न केले होते.
अशी किती तरी जोडपी बघीतली, पाहिली अनेक, असंख्य किस्से बघण्यात आलेत, अनुभवलेत.

पण काही जोडपी अशीही बघीतली की एकाचे दुखत असेल तर त्रास दुसर्याला त्रास जाणवतो, माझे पुण्याचे काका होते ते आमच्या काकूला इतके जपायचे की त्याच्या गोळ्या, त्याचे खाणे, पिणे अंथरूण पांघरुन ते स्वतः जातीने लक्ष देवून करत असत. तसेच माझी अजमेर येथील आत्या तिचे मिस्टर पण (आमचे आबा) ते सुद्धा दोघही एकमेकासाठी जीव की प्राण होते. तशीच माझी आते बहीण, मेव्हणे, सख्खी लहान बहीण पण एक आर्दश जोडपे म्हणता येईल असे आहेत.

एक मुलगा असचा सर्वगुणसंपन्न वधू मिळावी म्हणून वण वण फिरला अजुनही तो अविवाहित आहे. आज त्याचे वय सत्तर आहे. एकाने विचारले कारे तुला एकही मुलगी पसंत पडली नाही का? तर तो म्हणाला ती मला पसंत पडली पण तिच्या दृष्टीने मी सर्वगुणसंपन्न नव्हतो.

जर तुम्ही तुमच्या मनातला जोडीदार शोधायला गेलातर आयुष्य संपेल पण तो मिळणार नाही…. जगात सारे मिसमाँच आहेत. पण तरी ही सुखाने संसार करीत आहे. कारण तडजोड, एकमेकाना गुणदोषासह एकमेकांनी त्यानी मनापासून स्वीकारल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!