सामाजिक कट्टा

लग्न् एकाचे आणि त्रास दुसऱ्या व्यक्तीला

लग्न् म्हणजे दोन परिवारासाठी आनंदाचा दिवस .दोन व्यक्ती  साठी एतिहासिक क्षण.आयूष्याची एक नविन सुरूवात .यात काय दुमत नाही.पण आपल्या मुळे जर आजुबाजूच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर तो आनंद काय कामाचा? एखाद्या  व्यक्तीला त्रास दयायचा आणि आपण आनंद साजरा करायचा हे न पटण्यासारख आहे का?

सकाळी नेहमी प्रमाणे उठलो आणि  चिंतन करण्यासाठी आश्रमात गेलो.‍ चिंतन सुरू असताना अचानक आवाज आला  हिंदी गाण्याचा , आवाज एवढा होता की कानाला त्रास होउ लागला .मनन चिंतन करण्यात अडथळा येउ लागला.मन अस्थिर झाले आणि मनात राग निर्माण व्हायायला लागला.

 माझ्या लक्षात आले की माझ्या स्वातंत्र्यावर न कळत या आवाजामुळे निर्बंध लादले गेल..घटनेनुसार मला काही अधिकार प्राप्त् आहेत आणि आपले काही कर्तव्य् सुध्दा आहेत.राज्य् सरकारचे सुध्दा कर्तव्य् आहे की आपल्या नागरिकासाठी राहण्यायोग्य् चांगले वातावरण  निर्माण करणे पण ना नागरिक स्वताचे कर्तव्य् पार पडताना दिसत नाहीत ना सरकार.

 तो आवाज होता लग्नामध्ये परंपरेनुसार नाचत गाजत जात असलेला एका लग्नातील साउंड सिस्टिम चा. जवळपास  ५०० मीटर च्या आसपास च्या लोकांना या मुळे कमीत कमीत दोन तास आवाजामुळे त्रास सहन करावा लागला..बाजूला एक मंदिर आहे तेथे सर्व वयस्क्र असतात.त्यांच्या कानाला ‍किती त्रास झाला असेल याची कल्पना न केलेली बरी.

लग्नांसाठी असलेले  लग्न् कार्यालय शहराच्या बाहेर असणे गरजेचे आहे .जवळपास शाळा,हॉस्टेल ,आश्रम  यासारख्यांपासून तरी कमीत कमी लाब असणे गरजेचे आहे. तसा नियम असेल नसेल ते माहीत नाही पण आपली  सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुळे कोणाला त्रास होता कामा नये .दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. माझी शांतता भंग करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला.

 असे झाले की आनंद एकाला आणि  त्रास दुसऱ्याला

लेखक –  राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!