ब्लॉगिंग कट्टासामाजिक कट्टा

संस्थाच मुळात जाती जाती मध्ये भेद निर्माण करण्यास कारणीभूत ?

 माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण धाराशिव मध्ये झाले. वर्गातील सगळेच माझे मित्र ,कोणाशी वैर नाही.मी सगळयाजणांबरोबर मिळून मिसळून राहत असे..कधी वाटलेच नाही की आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असतो म्हणून..

 लहानपणी पहिला फरक जाणवला तो म्हणजे सण साजरे करण्याच्या पध्दतीमध्ये ..मुस्लिम बांधव एक वेगळया पध्दतीने सण साजरा करतात आणि दुसऱ्या बाजूला दिवाळी ,गणपती ,रक्षाबंधन साजरे करणारे..म्हणजे येवढाच भेद माहिती होता त्यात दुसऱ्या पध्दतीत मी मोडत होतो.

 दुसरा तीव्र भेद जाणवला तो  म्हणजे उच्च शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये..माझ्या पेक्षाही कमी मार्क असणारे तरिही त्यांना प्रवेश मिळाला हे पाहून अजून आपण कोणीतरी वेगळे असण्याची आणि ते पण कोणी वेगळे असण्याची भावना निर्माण करण्यात माझ्या मनामध्ये शासनाला यश आले..आणि फी मध्ये जमीन आसमान चा फरक असल्याचे बघून मनामध्ये कुठेतरी भेद निर्माण होण्यास चालू झाला…एवढेच नाही जेव्हा मित्र एकमेकांना मार्क विचारू लागले आणि त्याचे मार्क आपल्या पेक्षाही कमी आहेत हे जाणवलं तेव्हा हलूच एकाने नाजूक विषयात हात घातला..अरे तूझी जात कोणती आहे.मग त्या समोरच्या मित्राने अमूख अमूख माझी जात आहे .त्यामुळे माझा नंबर या कॉलेज ला लागला आहे असा तो म्हणाला..हे ऐकून अजून व्यक्ती व्यक्ती मधील बघण्याचा द्दष्टीकोन बदलत गेला.

 धर्म माहित नव्हता सणामुळे माहित झाला,जात माहित नव्हती ती शिक्षणातील भेदामुळे माहित झाली.तरीही कोणाविषयी तिरस्कार नव्हता..सगळया समाजातील मित्र जिवलग मित्र ..पदवी शिक्षण घेतले सगळया समाजातील मित्राबरोबर एकत्र..आणि उतरलो स्पर्धा परिक्षेमध्ये मग तर काय जातीचे भंडारच माझ्या समोर उभे राहिले..ज्या मित्राबरोबर पदवी पर्यंत कधी जात धर्म विचारला नव्हता आज जो कोणी भेटतो स्पर्धा परिक्षेमुळे बोलता बोलता सहज त्याला विचारतो की तू कोणत्या जातीचा आहे..जो पण सरळ सरळ सांगतो की मी या या जातीचा आहे..अजून भेद निर्माण होण्यास हे पण कारण आहे. तरिही येथे वैर नाही .अजूनही सगळया जातीच्या मित्राबरोबर संबंध चांगले आहेत.. 

 आणि समाजावर खूप परिणाम करणारी गोष्ट ते म्हणजे लग्न करताना विचारला जाणारा प्रश्न , अरे माझ्या मुलाच लग्न करायच आहे तूमच्या गावात कोण अमुख अमुख जातीची मुलगी असेल तर मला सांग नक्की..

पण आज शेजारी एक बहूजन रयत परिषद भरली आणि त्याचे कार्यालयाचे उद्धाटन करायला काही जण विशिष्ट जातीचे माझे भारतीय बाधंव जमा झाले..त्यांचा हेतू चांगला असेल पण माझ्या मनामध्ये मी कोणी तरी वेगळा आणि ते कोणी तरी वेगळे ही भावना अजून तीव्र झाली ..

म्हणजे लोकां लोकांमधील भेद निर्माण करण्यास पहिल्यांदा धार्मिक संस्था,त्यांच्या नंतर शिक्षण संस्था ,त्यांच्या नंतर या सामाजिक  संस्था जबाबदार आहेत..

प्रत्येक जण विशिष्ट समूहाचे रक्षण करण्यासाठी संस्था काढत आहेत..प्रत्येक संस्थेने एक विशिष्ट लोकांनाधरुन जाण्याचा निर्धार केला आहे..

जेवढया या संस्था मोठया होतील तेवढा भेद वाढत जाणार ..लोकांच्या कल्याणाच्या नावाने कल्याण राहिले बाजूला आणि एकमेकांमधील भेद वाढवण्यात यांचा मोलाचा वाटा दिसत आहे.

शेवटची बाब म्हणजे पक्ष विशिष्ट जाती साठी पक्षाची स्थापना करताना दिसत आहेत..याने काय साध्य होईल..निवडूनका लढवताना तुम्हाला मते मिळतील पण समाजावर याचा खूप परिणाम होत आहे..प्रत्येक समाजामध्ये भिंत उभा राहण्यास  तुम्ही हातभार लावत आहात..

लवकरात लवकर आर्थिक बाजूचा विचार करून आर्थिक द्ष्टया दुर्बल लोकांना फक्त शासनाच्या योजना असाव्या ,हा जो भेद आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा..

एकसंघ भारत आणि भारतीय सर्व हीच भावना बळकट करावी..मी याच जातीचा मी त्याच जातीचा याच्यातून बाहेर पडून मी फक्त भारतीय ही भावना तीव्र करावी..

देवाने जात पात पाडलेली नाही,आपणच आपल्या स्वार्थासाठी भेद निर्माण केला आहे. या पृथ्वी वर तीनच जाती देवाने बनवल्या आहेत ते म्हणजे स्त्री ,पुरुष आणि तृतीयपंथी .

याच्या व्यतिरेक जर कोणती जात तूम्ही मानत असाल तर  तूम्ही भेदभाव करण्यास खतपाणी घालत आहात..

ताज उदाहरण बधायच झाल तर ओबीसी आरक्षण भेटल्या शिवाय निवडुनका आम्ही होउ देणार नाहीत असे सर्व पक्ष म्हणत आहेत..यावरून काय कळाले आपला विकास थांबलेला आहे ,विकासाच्या कामाला गती येत नाही..आपण अजून हा या जातीचा ,तो त्या जातीचा याच्या मध्ये अडकून पडलेलो आहोत..

लवकरात लवकर भारत जात या शब्दापासून मुक्त करावा,आणि आम्ही भारतीय ही भावना बळकट करावी,जे गरीब आहेत त्याच्या साठी विशिष्ट योजना आणून प्रत्येक जणांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा..

  लेखक :  राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!