ब्लॉगिंग कट्टाराजकीय कट्टासामाजिक कट्टा

लोकशाही मजबूत करणाऱ्या निर्णयाचे मनापासून स्वागत

आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले.आज खऱ्या अर्थाने लोकशाही चा विजय झाला आहे.आज खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या स्वप्नाला ताकद भेटली आहे..आज खऱ्या अर्थाने कर्म जर करत गेलात तर त्याचे फळ मिळते हे सिध्द झाले आहे..आज खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय भारतात मिळतो हे  सिध्द झाले आहे..आज खऱ्या अर्थाने एखाद्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी चे पाउल पडले आहे.

भारताचे राष्ट्रपती मा.रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या काही ‍दिवसात संपणार आहे..देशाला नविन राष्ट्रपती काही दिवसात लाभणार आहेत.

राष्ट्रपती म्हणजे भारताचा राष्ट्रप्रमुख असतो.त्यांच्या स्वाक्षरी शिवाय कोणताही कायदा पारीत होउ शकत नाही..अशा उच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान होणार असेल तर नक्कीच आपण या निर्णयाचे मनापासून स्वागत करणे गरजेचे आहे..जरी भाजप चा छूपा अजेंडा असला तरी ही भारतातील लोकशाही ला शोभेल असा हा निर्णय आहे.

 अजूनही काही ठिकाणी महिला म्हंटल की चूल आणि  मूल याच्या शिवाय त्यांच्या आयुष्यात काहीच नसते..आज  भावी राष्ट्रपती मा. द्रोपदी मूर्मू यांच्या कडे बघून सर्व महिलांना प्रेरणा मिळेल,आणि हळू हळू का पण समाजामध्ये बदल होण्यास नक्कीच हातभार लागेल..

हेही वाचा : तूमची किंमत ५०० रुपये आहे का ??

 ओडिशा राज्यातील असलेल्या आपल्या भावी राष्ट्रपती कला शाखेच्या पदवीधर ,लिपिक पदापासून ते राज्यपाल पद भूषविणाऱ्या आता भारताच्या पहिल्या महिल्या आदिवासी राष्ट्रपती होणाऱ्या मा. द्रौपदी  मुर्मू यांनी खरा आदर्श उभा केला असेल तर तो अशा महिला आहेत ज्या आपल्या रंगाबद्दल उदासीन असतात त्यांच्या समोर यांनी खरा आदर्श निर्माण केला आहे की तूम्ही फक्त कर्म करत राहा लोक तुमचा रंग नाहीत बधत तूमचे काम बघून तुमचा आदर करतात..

मेहनती समोर सर्व जण तूमचा आदर करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे..जर तूम्ही मेहनती असाल तर एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल..

या निर्णयाचा परिणाम पूर्ण जगावर होणार आहे..आपल्या कडे लोकांचा बघण्याचा द्दष्टिकोन बदलणार आहे..इतर देश लोकशाही  म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणून भारताकडे बघतील..

अशे काही देश अजून आहेत त्या देशामध्ये महिलांना शिक्षण घेण्याचा सुध्दा अधिकार नाही..अशे काही देश आहेत त्या देशात महिला घराच्या बाहेर सुध्दा पडू शकत नाहीत..अशे काय देश आहेत त्या देशामध्ये महिलांना खेळाच्या मैदानामध्ये जाण्यास सुध्दा मनाई आहे..अशे काय देश आहेत त्या देशात महिलांना विशिष्ट कपडे घालूनच बाहेर पडावे लागते..अशे काय देश आहेत  महिला म्हणजे फक्त अपत्य जन्माला घालण्यासाठीच बनल्या आहेत असे विचार जगत आहेत . असे काय देश आहेत त्या देशात महिलांना काहीच स्वातंत्र्य नाही ..अशा सर्व देशांसाठी आपल्या देशाच्या राष्ट्रपती आणि आपला भारत आदर्श असणार आहेत..

 कारण  आज आपल्या राष्ट्रपती पूर्ण देशाचा कारभार चालवणार आहेत..जरी त्या नामधारी प्रमुख असल्या तरी प्रत्येक निर्णय त्याच्या स्वाक्षरी शिवाय होणार नाही .

हेही वाचा : ह्या नेत्यांनी कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ..??

भारतीय जनता पार्टी चे मनापासून आभार की त्यांनी आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला..

राष्ट्रपती पद हे घटनात्मक पद आहे.भारतीय राज्यघटनेनुसार कलम ५२ नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे.कलम ५२ ते ६० मध्ये शपथ,अधिकार,पात्रता ,अटी याच्याबद्दल तरतूद केलेली आहे.

जरी नामधारी पद असले तरी भारतीय राष्ट्रपतीला विशिष्ट असे अधिकार पण देण्यात आले आहेत..क्षमा करण्याचा अधिकार कलम ७२ नुसार राष्ट्रपतीला देण्यात आला आहे.एखादयाची शिक्षेची तीव्रता कमी करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.

  एखादे राज्य भारतीय राज्यघटनेनुसार जर काम करत नसेल तर त्या राज्यात राष्ट्रपती कलम ३५२ ,कलम ३५६ तसेच ३६० नुसार राष्ट्रपती राजवट लावू शकता..

एखादे विधेयक घटनेच्या मुलभूत बाबी च्या ‍ विरूध्दात असेल किंवा राष्ट्रपतींना वाटले की हे विधेयक घटनाबाह्य आहे तर विधेयक ते रोखून ठेवू शकता,वेळेचे बंधन नसल्यामुळे हा अधिकार त्यांचे महत्व अधोरेखित करतो.

राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तींने केलेल्या विधानाला ,घेतलेल्या निर्णयाला ,कोणत्याही भाषणाला ,त्यांचा कार्यकाळ संपेपर्यत त्याच्या न्यायालयात जाता येत नाही..हा पण संसदेमध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवला जाउ शकतो.

सांगण्याचे तात्पर्य की आपले राष्ट्रपती नामधारी असले तरी त्यांच्या शिवाय कोणताही कायदा ,कोणतेही विधेयक मंजूर होउ शकत नाहीत.आणि अशा पदावर एक महिला विराजमान होत आहे हा खरा लोकशाही चा विजय आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.

जॉईन करा मराठी उद्योजक ग्रुप

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!