भारत देशराजकीय कट्टासामाजिक कट्टा

मूलभूत कर्तव्याची जाणीव !

मूलभूत कर्तव्याचे तसेच मार्गदर्शन तत्वाचे रूपांतर हक्कामध्ये करण्याची वेळ आली आहे.

आपल्या घटनेमध्ये आपल्याला काही हक्क मिळाले आहेत..आणि ते जर हक्क जर कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण न्यायालयामध्ये जावून ते हक्क परत मिळवू शकतो..

       या हक्काबरोबर आपले आपल्या देशाप्रती तसेच आपल्या समाजाप्रती काही जबाबदारी असते ती घटनेमध्ये काही कलमाखाली त्याचा उल्लेख केलेला आहे पण आपण ते कर्तव्य आपल्या जीवनात अमलात आणले नाही तरीही कोणी आपल्याला शिक्षा करू शकत नाही..कारण घटना तयार करणाऱ्या महान व्यक्तींनी भारतातील व्यक्ती खूप शहाणे आहेत ,खूप हूशार आहेत,समजूदार आहेत ,त्यांना देशासाठी काय करायचे आणि काय नाही करायचे हे शिकवण्याची गरज नाही म्हणून त्यांनी मूलभूत कर्तव्य जर आपण बजावले नाही तर आपल्याला शिक्षा वगैरे आपल्याला होत नाही..पण त्यांना कुठे माहित होते की आपल्या समाजातील पूढे चालून अशी पिढी निर्माण होईल की तिला आपल्या स्वत: शिवाय समाजात काय घडत आहे याचे काहीही घेणे देणे नसेल..

आज आपल्या पैकी खूप जण आपली काही नैतिक जबाबदारी ,काही कर्तव्ये असतात हेच विसरून जगत आहेत..त्यांना हे पण समजत नाही की एखादया सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपण कशा प्रकारे वागले पाहिजे,

 आजही शासनाच्या कार्यालयामध्ये जावून बघा ,काय अवस्था कर्मचाऱ्यांनी तसेच तेथे वावरणाऱ्या लोकांनी करून ठेवली आहे..त्यांच्या कोणाचा धाकच राहिला नाही..

उस्मानाबाद मध्ये मोजक्या अशा काही सामाजिक संस्था आहेत की ते विदयार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यासिका चालवत आहेत..आता या अभ्यासिका सार्वजनिक असल्यामुळे याच्यावर नियत्रण,या सामाजिक संस्थेची निगा राखणे,आपली अभ्यासिका स्वच्छ ठेवणे,अभ्यासिकेमध्ये शांतता ठेवणे ,बाहेर जात असताना कसलाही आवाज न करता बाहेर जाणे,एखादा कॉल तूम्हाला आला तर बाहेर जावून त्या परिसरामध्ये आपल्या मूळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे,अभ्यासिकेच्या आवारामध्ये तंबाखू,मटेरिअल न खाणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे..हे आपले मूलभूत कर्तव्ये आहे..

       आपण पूढे चालून एक चांगले नागरिक होणार आहोत भारताचे मग त्यासाठी आपल्याला आपल्या वागण्यामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे..आपल्याला भेटलेल्या हक्काबरोबर आपले कर्तव्ये आपण बजावले पाहिजे..

       कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपली नैतिक जबाबदारी आपण बजावली पाहिजे.

पण उस्मानाबादमध्ये काही सामाजिक संस्था चांगला उपक्रम राबवत आहेत..मूलांना मोफत अभ्यासिका उपलब्ध करून त्यांनी दिल्या आहेत पण त्याचा वापर समाजातील ज्यांना खरच गरज आहे अशा लोकापर्यंत न पोहचता अशा लोकांपर्यंत पोहचली आहे की ज्यांना खरच गरज नाही आणि ते बाहेर जावून दुसऱ्या अभ्यासिकेमध्ये फि भरून अभ्यास करू शकतात..आणि अशा काही विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी व्यसन करून तेथील परिसर घान करत आहेत..

       मग अशा विद्यार्थ्यांना शिस्त नसल्यामुळे ,त्यांना आपली काही कर्तव्य असतात हे माहित नसल्यामुळे किंवा त्यांची त्यांना जाणीव नसल्यामुळे ते सर्रास गोधंळ घालतात आणि तेथील वातावरण खराब करतात..

मग अशाच गोष्टी सार्वजनिक कार्यालय तसेच नगरपालिका अशा ठिकाणी होताना दिसत आहेत..

आज च्या या दशकात युवक स्वार्थी ,घमंडी ,अहंकाराने भरलेला,आणि दुसऱ्याबद्ल मनात द्वेष घेउन चलणारा आणि आपल्या मनाप्रमाणे वागणारा अशा युवकांची संख्या वाढत आहेत..

माझ काम भागतेय ना मग मी दुसऱ्याचा का विचार करू या विचारांने आजकालचे काही युवक चलताना दिसत आहेत.

आज भारताचा विकास चांगल्या पध्दतीने करायचा असेल तर आज खरच वेळ आली आहे की घटनेतील मार्गदर्शक तत्वांना आणि मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कासारखे संरक्षण देण्याची आणि कर्तव्ये न्यायालयामार्फत राबवून घेण्याची जर एखादा व्यक्ती कर्तव्य बजावत नसेल तर..

       कारण काही जणांन कशाचिच भिती नसते त्यामुळे ते बिनधास्त आपल्या मनाला येईल तसे जगत असतात पण त्यांना दाखवून देण्याची हीच वेळ आली आहे की कर्तव्ये सुध्दा बजावायचे असतात.

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!