ब्लॉगिंग कट्टामनोरंजन कट्टाराजकीय कट्टा

उस्मानाबादची भयानक अवस्था शहाजी बापू पाटील यांच्या अंदाजामध्ये

काय उस्मानाबाद

काय ते उघडया नाल्या

काय ते रस्त्यावरील खडडे

काय ते मुद्दामून सोडून दिलेली डुकरं

काय ते कुणाच्या मालकीचे नसलेले जनावरे

काय ते इंदिरा नगर

काय ते इंदिरा नगर समोरील घानीचे साम्राज्य

काय ते बस स्टॅन्ड वरील घान

काय ते बस स्टॅन्ड वरील स्वच्छता

काय ते बॅनरबाजी

काय ते बसस्टॅन्डच्या शेजारील दारू चे दुकान

काय ते नगरसेवक

काय ते नगरपालिकेचे कर्मचारी

काय ते गायब असलेले नगरपालिकेचे कर्मचारी

काय तो आठवडी बाजार

काय ते श्री चित्रपटगृह

काय ते रस्त्यावर बसेलेले भिकारी

काय ते तूळजाभवानी स्टेडियम

काय ते नाटक न होणारे नाटयगृह

काय ती भोगावती नदी

काय तो सरकारी दवाखाना

काय ते सरकारी कर्मचारी

काय ते युवकांना कर्ज न देणारी मुद्रा योजना

काय ते वेसन करणारे बेरोजगार तरूण

काय ते वाढलेल्या टपऱ्यांची संख्या

काय ती आडत

काय ते पुडया खाउन शिकवणारे मास्तर

काय त्या शाळेतील सुविधा

काय ते उच्च शिक्षण

काय त्या डायरेक्ट परीक्षेला ये म्हंटणाऱ्या संस्था

काय ती शिक्षणाची पातळी

काय ती शहराची स्वच्छता

काय ते सुन्न पडलेली बाजारपेठ

काय ते साखर कारखाने

काय ती युवंकाची दुसऱ्या शहरात रोजगारासाठी होणारी भटकंती

काय तो गणेश नगर च्या पाठीमागील बाजूचा कचऱ्याचा ढीग

काय ती चार दिवसातून एकदा येणारी कचऱ्याची गाडी

काय ती बँकेतील वयस्कर लोकांच्या रांगा

काय तो रेल्वे स्टेशनचा दिवे नसणारा रस्ता

काय ते रात्री ९च्या आत बंद होणारं मार्केट

काय ते सेंट्रल बिल्डींग मधील पानाने ,तंबाखू खाउन लोकांनी रंगवलेली भिंत

काय ती मुतारीची अवस्था

काय ते बसमधील स्वच्छता

काय ते बोटावर मोजता येतील एवढे उदयोग

काय त्या लेण्यांची अवस्था

काय तो शहरातून गेलेला हाय वे बिना सर्विस रोड चा

काय ते प्रायव्हेट शाळेवरील शिक्षकांची अवस्था

काय त्या आउटलेट नसल्याला नाल्या

काय त्या कागदावरच्या योजना

काय तो लपून बसलेला भूहारी गटारीचा प्रकल्प

काय तो वापस जाणारा निधी

काय ते  नौकरी साठी  आई वडीलांना सोडून जाणारे पोरं

काय ते आमदारांच,खासदाराच जिल्हयाकडे असलेले लक्ष

काय ती गरिबी

काय ते जिल्हयाचे ठिकाण

काय ते उस्मानाबाद

काय ते धाराशिव

सर्व कसं कसं कसं कसं      एकदम ओके…धाराशिव चा पुत्र –  राम ढेकणे  (हा लेख धाराशिवच्या काळजी पोटी लिहिलेला आहे…माझे धाराशिव वर तितकेच प्रेम आहे जेवढे तुमचे ..कोणी वाईट वाटू न घेता याच्यावर विचार करावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!