राजकीय कट्टा

ह्या नेत्यांनी कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ..??

ऐन दिवाळीत अहमदनगर हाॅस्पिटलला आग लागून अकरा कोविड रुग्णांचा दु:खद अंत झाल्याचे समजले, आणखी दहा जखमी असून उपचाराखाली आहेत. गेल्या वर्षभरातील, महाराष्ट्रातील हाॅस्पिटलच्या आगीची ही सहावी घटना!
राज्यकर्त्यांना खंत नाही, प्रशासनाला लाज नाही, आरोग्य कर्मचाऱ्यांना आग विझवणे हा त्यांचाही विषय आहे, याची ओळख नाही, हाॅस्पिटल निर्मिती करताना अग्निशमन सुरक्षेसाठी National Building Code तयार झाला आहे, याची बांधकाम विभागाला जाणिव नाही, दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील सरकार एवढे संवेदना हीन झाले आहे, पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना सरकवले आणि चौकशीचा फार्स केला की सारेच उध्दट पावन होऊन जातात. kuthe neun thevlay


रेल्वे च्या अपघातात रेल्वेची चूक समजल्यावर त्यावेळचे रेल्वेमंत्री स्व. लाल बहादूर शास्त्रींनी मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. मी आज राजिनामा द्यावा अशी मुळीच मागणी करत नाही, पण हाॅस्पिटलच्या सहाव्या आगीला कोणते मंत्रालय जबाबदार आहे, सदोष बांधकामासाठी बांधकाम मंत्रालय, निरपराध रुग्णांच्या मृत्युसाठी आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करू न शकणारे गृहमंत्रालय की सहाव्या आगीपर्यंत कारणांवर मात करू न शकणारे मुख्य मंत्रालय!
सर्व हाॅस्पिटल्सचे फायर ऑडिट केले जाईल, असे सांगितले गेले. पण आजही कोणत्याही हाॅस्पिटलमधे इमरजन्सी फायर एक्झिट दिसला नाही, बेडरिडन पेशंटला फायर इमरजन्सी मधे कसे रेस्क्यू करायचे माॅकड्रील दिसली नाही. आगीमध्ये लिफ्टचा उपयोग केला जात नाही, अजूनही कित्येक हाॅस्पिटल्समधे इमरजन्सी बेडसह पेशंटस् शिफ्ट करण्याची सोय नाही. ह्या नेत्यांनी

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर


आज अकरा रुग्णांच्या अपघाती मृत्यूचे दु:ख ना टोप्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते ना उध्दव ठाकऱ्यांच्या चेहऱ्यावर!

पाच लाख रूपये फेकले की दोन चार दिवसांत शांत होते सारं, एवढं काज्युअल घेतलंय, मंत्रीमंडळाने!
आर्यनला वाचवण्यासाठी आणि प्रशासनाच्याच अधिकाऱ्यावर वार करण्यासाठी, नबाप इरेस पेटले होते, समिरच्या आई-बाबा बहीणबायकोपर्यंत वार करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. आज नबाप, मृतात्म्यांचे सांत्वन करताना दिसले नाहीत, किंवा कोणावर आगपखड करताना दिसले नाहीत, मृतात्म्यात कोणी मुस्लिम नव्हते काय? गेल्या सत्तर वर्षांत राज्य जेवढा जातीधर्मवाद शिकला नाही, तेवढा वाद ह्या सरकारने शिकवला आहे. ओबीसी मराठा, अल्पसंख्याक असे ध्रृवीकरण करण्यात मविआ सरकार विजयी झाले आहे. पण हे ध्रृवीकरण शिवसेना आणि राष्ट्रिय काँग्रेस ला धोकादायक ठरणार आहे. ह्या नेत्यांनी


करोना कमी होत आहे, औद्योगिक आणि आर्थिक घडी नीट बसविण्याची हीच वेळ आहे, मग एसटीचा संप नियंत्रित करण्यासाठी कोणीही का प्रयत्न करत नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या अत्यंत रास्त असूनही मंत्र्यांना औद्योगिक शांततेचे कोणतेही महत्त्व वाटत नाही.
छपन्न सहकारी कारखाने मागच्या दाराने ढापण्याचे दुःख कोणत्याही काका पुतण्या च्या चेहऱ्यावर दिसले नाही.
गेली दोन वर्षे शेतकऱ्यांवर भयंकर निसर्ग संकटे येऊनही विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळू न देणारे हे सरकार,
संवेदनशून्य झाले आहे. कोणतीही नियोजन बुध्दी नसलेले हे सरकार शेवटच्या घटिका मोजू लागले आहे, सरत्या करोना काळात येऊ घातलेल्या निवडणूका महाराष्ट्राला सुगीचे दिवस दाखवेल काय? ह्या नेत्यांनी

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!