आरोग्य कट्टा

केसात कोंडा होणे आणि त्यावरचे उपाय

केसात कोंडा (Dandruff) होण्याची समस्या अनेकांना असते. केसात कोंडा झाल्याने केसात खाज होत असते तर कधीकधी यांमुळे डोक्यात इन्फेक्शनही होऊ शकते. केसात कोंडा होण्यामुळे केस कमजोर बनतात त्यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्याही उभी राहते.

केसात कोंडा होण्याची कारणे :

अनेक कारणांमुळे केसात कोंडा होऊ शकतो यामध्ये,
• हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे,
• केसांची योग्य निगा न ठेवणे,
• केसांना तेल न लावल्यामुळे तसेच जास्त तेल झाल्यामुळेही,
• चुकीच्या पद्धतीने केस विंचरने,
• शॅम्पूचा जास्त वापर करणे,
• अयोग्य आहार आणि पोषकतत्वांचा अभाव,
• मानसिक ताणतणाव,
• सोरायसिस, खरूज (scabies) यासारखे त्वचासंबंधी आजार असल्याने, अशा अनेक कारणांनी केसात कोंडा होण्याचा त्रास होऊ शकतो.

केसातील कोंडा दूर करण्याचे उपाय :

लिंबू रस –

पाच चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबूरस मिसळावे. हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी केसांच्या मुळांना चांगल्या पद्धतीने लावावे. अर्ध्या तासानंतर आंघोळ करताना केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या दूर होईल.

मेथीच्या बिया –
एक चमचा मेथीच्या बिया बारीक वाटून घ्याव्यात. दोन कप गरम पाण्यात त्या बारीक केलेल्या बिया घालाव्यात व रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करून अंघोळीपूर्वी केसांना लावावे व 20 मिनिटानंतर आंघोळ करताना केस धुवावेत.

कापूर –

गरम केलेल्या खोबरेल तेलात कापूर घालावा आणि कोमट झाल्यावर ह्या तेलाने केसांना मालिश करावी. व 20 मिनिटानंतर आंघोळ करताना केस धुवावेत.
कोरपडीचा गर –
अंघोळ करण्यापूर्वी 15 मिनिटे आधी केसांच्या मुळांना एलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत.

दही –

केसांच्या मुळांना दही लावावे आणि 20 मिनिटे झाल्यावर हर्बल शॅम्पूचा वापर करून केस धुवावेत. ह्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

केसात जर कोंडा असेल तर ही काळजी घ्या..
कोंड्यामुळे डोक्यात खाज येत असल्यास जास्त खाजवणे टाळा. कारण असे करण्याने त्वचेतून रक्त येण्याची आणि इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे केसांची मूळंही हलतात आणि त्याचा परिणाम होऊन केसगळती होते.

शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं शॅम्पू वापरावा. यात प्रामुख्याने पिरिथिओन झिंक, सॅलिसिलिक अॅसिड, केटिकोनाझोल आणि सेलेनियम सल्फाईडसारखे हे घटक असलेला Anti-Dandraff शॅम्पू वापरावा यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.
तसेच चांगला कंडिशनरही वापरावा. यामुळे केसांच्या त्वचेला योग्य मॉईस्चर मिळते आणि केसांची त्वचा कोरडी पडत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!