आरोग्य कट्टा

( Basil) काळ्या तुळशीची लागवड ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान; खर्च कमीत कमी आणि कमवाल भरपूर

Cultivation of black basil will be a boo

शेतकरी आता परंपरागत पिकांना तिलांजली देत असून विविध वैशिष्ट्यपूर्ण अशा पिकांकडे वळत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, विविध प्रकारचा विदेशी भाजीपाला आणि एवढेच नाही तर सफरचंद सारखा प्रयोग देखील यशस्वी केला जात. ( Basil)

यासाठी कृषी विभागाकडून देखील सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. यामध्ये जर औषधी वनस्पती लागवडीचा विचार केला तर शेतकरी बऱ्या प्रमाणात आता या पिकांकडे देखील वळत आहेत. औषधी वनस्पतींमध्ये शतावरी, अश्वगंधा यासारख्या पिकांची लागवड महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामध्ये जर आपण तुळशीचा विचार केला तर औषधी पिकांमध्ये व व्यावसायिक पिकांमध्ये काळ्या तुळशीचे पीक हे व्यापारी पद्धतीचे आहे. काळ्या तुळशीचीविचार केला तर औषधी पिकांमध्ये व व्यावसायिक पिकांमध्ये काळ्या तुळशीचे पीक हे व्यापारी पद्धतीचे आहे. काळ्या तुळशीची लागवड करून शेतकरी कमी खर्चा मध्ये जास्तीचा नफा मिळू शकतात. या लेखात आपण काळ्या तुळशीच्या लागवडीविषयी माहिती घेऊ. Basil

काळ्या तुळशीची लागवड

1- लागणारे हवामान आणि तापमान– ही तुळशी उष्ण हवामानाची असून यातुळशीच्या वाढीसाठी 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवातीला रोपांची वाढ मंद होते, परंतु उष्णता आणि सूर्यप्रकाशात वेगाने वाढ होते.
2- पेरणीची वेळ – या तुळशीची पेरणी आणि लागवडपावसाळ्यात करायची असल्यास जुलै महिन्यात योग्य मानले जाते. जुलै किंवा ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये या रोपाला लांबलचक अंकुर फुटतात व अंकुर लेली झाडे 40 सेंटीमीटर च्या ओळीत ठेवले जातात. लागवड केल्यानंतर लगेचच त्याला पाणी द्यावे लागते.

3- खत व्यवस्थापन– या तुळशीला फारच कमी प्रमाणात खताचे आवश्यकता असते. जवळ जमिनीची तयारी कराल तेव्हा सुरुवातीला आठ ते दहा टन कुजलेले शेणखत आणि या 80 किलो नायट्रोजन प्रति एकर द्यावे तसेच वनस्पतीची वाढ होत असताना खतांचे प्रमाण दोन भागांमध्ये विभागले जाते. आवश्यकतेनुसार सेंद्रिय खत किंवा शेणखत वापरावे. ( Basil)

हे पण वाचा (milk dairy) दूध डेअरी व्यवसायासाठी सरकार देत आहे अनुदान; ६६ टक्के सब्सिडी घेऊन सुरू करा डेअरी फर्म

4- पाणी व्यवस्थापन -तुळशीच्या रोपांची लागवड केल्यानंतर लगेच पहिले पाणी द्यावे. उन्हाळ्यात चार ते पाच वेळा पाणी द्यावे तसेच पावसाळ्यात जास्त सिंचनाची गरज भासत नाही. त्यानंतर गरज पाहूनपाणी द्यावे व वेळोवेळी ओलावा ठेवावा. ( Basil)

5- काळ्या तुळशीची काढणी उत्पन्न आणि नफा– हे पिक 120 ते 150 दिवसांत काढण्यासाठी येते. या तुळशी च्या पानापासून सरबत तयार करायचे असेल तर याची काढणी 60 ते 90 दिवसात करावी. या तुळशीचे पाने 40 ते 50 रुपये, बियाणे 200 ते 250 रुपये आणि लाकूड 40 रुपये किलो दराने विकले जाते. या तुळशीपासून हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन देते ज्यातून 80 ते 100 किलो तेल काढता येते. या तेलाचा बाजार भाव साडेचारशे ते पाचशे रुपये किलो आहे. या अर्थाने हेक्टर मध्ये 40 ते 50 हजारांचे उत्पन्न अगदी सहज रीतीने मिळते. Basil

काळ्या तुळशीचे औषधी गुणधर्म

या तुळशीचा वापर औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे सर्दी, ताप, खोकला, जुलाब, चेहऱ्याला लाली, श्वासाची दुर्गंधी, कॅन्सर वर उपचार,श्वासाची दुर्गंधी, कॅन्सर वर उपचार, स्त्रियांची अनियमित मासिक पाळी अशा अनेक आजारांवर याचा उपयोग होतो. या तुळशीच्या बिया पासून तेल काढले जाते त्याच्या तेलावर लवंग सारखा गोड वास असतो. या तेलापासून लघवी शी संबंधित अनेक औषधे बनविण्यासाठी उपयोग होतो. ( Basil)

(SBI Prime Visa Unsecured ) एसबीआई प्राइम क्रेडिट कार्ड की मुख्य विशेषतायें और लाभ वेलकम बेनिफिट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!