आरोग्य कट्टा

चिकनगुनिया

चिकनगुनिया या आाजाराचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं. कारण चिकनगुनिया झाल्यावर त्याचा त्रास १-२ वर्ष होतो असं म्हणतात.यामध्ये विचित्र अंग दुखी व भयंकर तापाने माणूस हैराण होतो. चिकनगुनिया म्हणजेच CHIKV व्हायरस संक्रमित डास चावल्यामुळे हा आजार होतो.चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही.चिकनगुनियाची लक्षणे वेळीच ओळखता आणि योग्य उपचार घेतले तर यातून लवकर बरे देखील होता येते. चिकनगुनिया

चिकनगुनिया लक्षणे

▶️अचानक ताप येणे (High Fever) व्यक्तीला अचानक तीव्र ज्वर म्हणजे ताप येतो. यामध्ये एकाला १०२-१०४° सेल्सिअस इतका ताप येऊ शकतो.काहीं ना या आजारात १ आठवडा तर काहींना त्या पेक्षा जास्त दिवस ताप येतो.

▶️सांधेदुखी (Joint Pain) चिकनगुनियाचे प्रमुख लक्षण या आजारपणात सांधेदुखी इतक्या तीव्र स्वरूपात असते की व्यक्तीला त्याच्या हातापायां ची हालचाल करणे ही शक्य होत नाही.अचानक हात,पाय जड होऊन चालणे,उठणे,बसणे कठीण होते.यातून बरं झाल्या- वरही काही महिने/वर्ष,२ वर्ष सांधेदुखी जाणवू शकते.

▶️डोकेदुखी- यात तापासोबत भयंकर डोकेदुखीचा त्रास होतो ज्यामुळे रुग्णाला तापासह डोकेदुखीच्या असह्य वेदना सहन कराव्या लागतात. चिकनगुनिया

▶️स्नायूंमध्ये वेदना जाणवणे (Muscle Pain)प्रामुख्याने अंगदुखी व शरीरातील प्रत्येक स्नायूंमध्ये असह्य वेदना होतात अचानक हात/पायाचे स्नायू दुखू लागतात आणि कोणतीही हालचाल करणे कठीण जाते. जर तापामुळे उठणे,बसणे/उभे राहण्यास त्रास होत असेल

▶️पुरळ(Rash)याचे आणखी १ प्रमुख लक्षण म्हणजे या आजारात शरीरावर कोणत्याही भागावर पुरळ उठू शकते.कधी कधी औषधांचा दुष्परिणाम म्हणून अंगावर लालसरपणा, पुरळ,चट्टे येतात.साधारणपणे हे लालपुरळ/चट्टे हाताचे तळवे, चेहरा आणि मांड्यावर येतात. मात्र असे झाल्यास घाबरू नका कारण १ सामान्य चिकनगुनि- याचे लक्षण आहे.काही काळा नंतर हे चट्टे आपोआप कमी होतात. चिकनगुनिया

▶️सांध्यांना सूज येणे (Swelling Around The Joints)सांधा शरीरातील एक असा भाग आहे ज्याठिकाणी २ हाडे एकमेकांमध्ये बसवलेली असतात.शरीरात गुडघा,कंबर, हात,पाय,कोपरा,मनगट,हाता पायाची बोटे अशा अनेक ठिकाणी सांधे असतात.या सांध्यामुळे हालचाल करणे सोपे होते.मात्र चिकनगुनियात सांध्यामध्ये सूज येते ज्यामुळे हालचाल करण्यास मर्यादा येतात.

▶️आर्थ्राटीस (Arthritis)

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर


यामध्ये निर्माण झालेली सांधे दुखी लवकर बरी झाली नाही तर त्याचे स्वरूप आर्थ्राटीसम- ध्ये होण्याची शक्यता असते. आर्थ्राटीस गंभीर स्वरूपाच्या सांधेदुखीचा आजार आहे. आर्थ्राटीस झाल्यास रुग्णाला सांध्यांच्या दुखण्यामुळे दैनंदिन कामे करणेदेखील कठीण होते. त्यामुळे अचानक जाणवणाऱ्या सांधेदुखीचे नेमके कारण शोधा व त्यावर योग्य उपचार करा.

▶️उलटी आणि मळमळ (Nausea And Vomiting)

यात तापासह मळमळ,उलटी चा त्रास जाणवू शकतो.चिकन गुनिया झाल्याने शरीर डिहाय- ड्रेट होते.ज्यामुळे डोकेदुखीसह मळमळ,उलटी होण्याची शक्यता असते.यासाठीच अशा रुग्णांना सतत पाणी पिण्याचा व शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देतो. त्यामुळे जर ताप,डोकेदुखीसह उलटीचा त्रास होत असेल तर ते चिकनगुनियाचे १ लक्षण नक्की असू शकते.

चिकनगुनिया वर घरगुती उपाय

चिकनगुनिया संक्रमित डास चावल्यामुळे होतो त्यामुळे तो होऊ नये यासाठी घरात डासां चा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्या.घरात स्वच्छता राखा.मात्र असं करून चिकन गुनिया झालाच तर याबाबत डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. चिकनगुनियाचे निदान रक्त चाचणीद्वारे करता येते.मात्र चिकनगुनियावर कोणतेही ठराविक वैद्यकीय औषध उपलब्ध नाही.रूग्णाच्या आरोग्यस्थितीनुसार चिकन गुनियावर डॉक्टर वैद्यकीय उपचार करतात.त्यामुळे चिकन गुनियाचे निदान झाल्यावर डॉक्टरी सल्ल्यानुसार यावर होमिओपॅथीचे उपचार करू शकता.

भरपूर पाणी प्या चिकन गुनिया झालेल्यांच्या शरीरात पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणा वर कमी होते.यासाठी चिकन गुनिया झालेल्यांनी सतत पाणी प्यावे.शिवाय जलयुक्त पदार्थ व ज्युस प्यायला हवे.ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होईल.जर चिकनगुनिया झालेल्यांनी कमी पाणी सेवन केले तर त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो.

दूधाचे पदार्थ खा चिकन गुनिया झालेल्यांनी दूध आणि दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवे.कारण दुधाच्या पदार्थांमुळे चिकनगुनियाच्या तापावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.शिवाय दुधाच्या पदार्थांत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.याचा चांगला परिणाम शरीरातील हाडांच्या आरोग्या वर होतो.हाडांची झीज भरून काढण्यासाठी डेअरी प्रॉडक्ट अशा रुग्णांच्या आहारात असायला हवे.

ओवा आहे उपयोगी

चिकनगुनिया झालेल्यांना ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ओव्यात थायमोल नावा चे तेल असते.ओवा १ नैसर्गिक एनेस्थिशियाप्रमाणे काम करतो चिकनगुनियामध्ये रुग्णाला असह्य वेदना जाणवतात.मात्र जर त्याने ओव्याचे सेवन केले तर काही काळासाठी या वेदना कमी होतात व रुग्णाला आराम मिळतो.

हळदीचे दूध कोणत्याही आजारपणात हळदीचे दूध १ रामबाण उपाय सांगण्यात येतो. कारण हळदीच्या दुधाने आतून शरीर निरोगी होते.यासाठीच अंगदुखीतून आराम मिळण्या- साठी/शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी हळदीचे दूध चिकनगुनिया झालेल्यांना पिण्याचा सल्ला दिला जातो.

पपईच्या कोवळ्या पानांचा रस चिकनगुनियावर ठराविक औषध नसले तरी नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात. चिकनगुनियाच्या तापामुळे शरीरातील रक्तपेशी मोठ्या प्रमाणावर कमी होतात.अशा काळात या रक्तपेशी भरून काढण्यासाठी पपईच्या कोवळ्या पानांचा रस पिणे फायद्याचे ठरते.यासाठी रोज पपईच्या पानांचा रस दर २ तासांनी ३ चमचे प्यावा.

लसणाचे करा सेवन

अंगदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी लसणासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. सांध्यावर आलेल्या सूजेवर लसणाचा रस लावू शकता. लसूण पेस्ट/रस लावण्यामुळे स्नायूंमधील रक्त प्रवाह सुधारल्यामुळे सांध्यांची सूज कमी होते आणि वेदनेतून हळहळू आराम मिळतो.

चिकनगुनियाबाबत मनात असलेले प्रश्न

▪️चिकनगुनियाचे संक्रमण शरीरात किती दिवस असते ?
चिकनगुनिया हा १ संक्रमित डास चावल्याने होणारा आजार असून त्यामुळे ८-१० दिवस रूग्णाला तीव्र ताप येतो आणि असह्य सांधेदुखीचा त्रास होतो. ताप जरी आठवड्यात कमी होत असला तरी रूग्णाच्या आरोग्यस्थितीनुसार अंगदुखी मात्र १ महिना ते वर्षभर जाणवू शकते.

▪️चिकनगुनिया पूर्ण बरा होतो का ? चिकनगुनियाची लक्षणे वेळीच समजली व योग्य चिकनगुनिया उपचार घेतले तर चिकनगुनिया इनफेक्शनपासून रूग्ण पूर्ण बरा होतो.मात्र काही रूग्णांना यामुळे काही महिने/ वर्षभर सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

▪️चिकनगुनिया झाल्यावर काय खाऊ नये ? चिकनगुनिया झालेल्या लोकांनी घरातील पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या.तेलकट,मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे टाळा. चिकनगुनिया झाल्यावर चुकून ही बाहेरचे उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नये.

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!