बातम्याब्लॉगिंग कट्टाशेती कट्टासामाजिक कट्टा

न समजणारे शेतकऱ्यांचे गणित

२४ एप्रिल २०२२ चा दिवस सकाळचे ६ वाजले होते .मित्राचे उदगीर ला लग्न असल्यामुळे सकाळी लवकर उठून आणि तयार झालो.धाराशिव ते उदगीर चा प्रवास करण्यासाठी सकाळ सकाळ मित्राच्या घरी गेलो ,त्याची गाडी घेतली ,आणि प्रवासाला निघणार तेवढयात अवकाळी पावसाने हजेरी लावली.सकाळी ६ च्या आसपास सूरू झालेला पाउस एक दीड तास झाले उघडला नाही,मला ब्रिज चा सहारा घ्यावा लागला.दोन तास त्या जागेवरून हालता आले नाही. त्या ब्रिज चा एक फायदा झाला ,काही व्यापाऱ्यांना आयती जागा भेटली व्यापार करण्यासाठी ,जवळपास १२-१३ व्यापा-यांना फायदा झाला त्या ब्रिज चा ..त्या दिवशी वाघोली या ठिकाणाहून एक शेतकरी मेथी च्या पेंढया पोत्यात घेउन रिक्षाने प्रवास करून आला. १० ‍ किमी चा प्रवास करून त्याने ब्रिज खालील एका व्यापा-याला मेथीचे पोते विकले..

व्यापारी आणि शेतकरी यांच्या मध्ये १५ मिनिट चर्चा झाल्यावर एक मेथी ७ रूपये दराने शेतक-यांने त्या व्यापाराला विकली.९५ पेंढया असतील त्या पोत्यामध्ये म्हणजे जवळपास ६६५ रूपये शेतक-याला मिळाले.

   मी त्या शेतक-याजवळ गेलो आणि विचारले आजोबा,एवढया स्वस्त: का विकली भाजी. काय करणार ७-८ रूपयाच्या वर कोण भाव देत नाही .आणि भाजी काढायला एका बाईने १०० रूपये घेतले.असे तो म्हणाला आणि रिक्षा ५० रूपये चे .कारण ओळखीचा होता. म्हणजे ६६५ मधले १५० गेले जर शिल्लक ५१५ रूपये राहिले ,याचा अर्थ  सकाळ सकाळ एक दिवसाची हजेरी भेटली काही तासामध्ये. त्यांना विचारले ,आजोबा तुम्ही का नाहीत बसत भाजी विकायला, थोडेसे हसत म्हणाले ,अरे बाबा शेतक-याला एक काम असतयं का,नाही वेळ भेटत,जणावरं आहेतीय,छोटे छोटे काम निघत असतात,काय सांगू तूला अजून.हो बरोबर आहे आजोबा पण थोडा विचार केला तर बघा तुम्ही विकलेली भाजी हा व्यापारी १५ ते २० रूपयांनी ग्राहकाला विकणार ..चला अस समजू की त्याने २० रूपयांनीच सगळया पेंढया विकल्या तर त्याला जागच्या जागी  १९०० रूपयांचा फायदा होत आहे.आणि तुम्हाला फक्त ५१५ रूपये फायदा होत आहे.जवळपास १३८५ रूपयांचे नुकसान तुमचे होत आहे.खरयं आहे तुझ पण दिवसभर अडकून राहवं लागत आहे ,त्याच काय.कोण बसणार..आणि दुसरे काम कोण करणार..त्यांच पण बरोबर होतच..असे म्हणून त्यांनी निरोप घेतला आणि ६६५ रूपये घेउन निघाले .मी पण तेथून निघालो माझ्या प्रवासाला..तेवढयात पाउस पण उघडला होता.

पण थोडा विचार केला तर जवळपास शेतकरी दुप्पट पैशावर पाणी सोडत आहे.याच्या वर त्यांनी नक्कीच काहीतरी उपाय काढला पाहिजे..‍

परिवारामधील एखादा व्यक्ती जरी बसला तरी शेतक-यांकडे दुप्पट पैसा येईल,शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारेल.शेतक-यांनी डायरेक्ट जर ग्राहकांशी व्यवहार जर केला तर अधिक फायदा त्यांना होईल.आपल्या कष्टाला योग्य भाव जर पाहिजे असेल तर शेतक-याला स्वत:च व्यापारी बनावे लागेल.

एकाने कष्ट करायचे आणि दुसराच व्यक्ती जर मोठा होत असेल तर हे कुठेतरी थांबले पाहिजे..ज्याचे कष्ट त्याला जास्त फायदा व्हायलाच पाहिजे..शेतक-यांसाठी स्वत: स्वत:चा माल ग्राहकाला विकला तर नक्कीच शेतकऱ्याचे सोन्याचे दिवस येतील..मधला व्यापारी ,दलाल जेवढा दूर करता येईल तेवढा दूर शेतकऱ्यांनी जर केला तर खूपच फायदा होईल..

काही दिवसापूर्वी मामाच्या मुलाने आपल्या शेतातला माल एका व्यापाऱ्याला गुत देउन टाकला आणि एकदम पैसे येतील या नादाने त्याने डायरेक्ट व्यापाऱ्याला माल विकला ..काही पैसे आले पण जर तोच दररोज बाजारात येउन त्याने थोडा थोडा विकला असता तर त्याच्या दुप्पट पैसा त्याला मिळाला असता…एवढेच की कष्ट करावे लागले असते अजून…

लेख लिहिण्याचे तात्पर्य असे की शेतकऱ्यांनी ग्राहकवर्गाबरोबर जर डायरेक्ट व्यवहार केला तर फायदा जास्त्‍ होईल..मी कृषीतज्ञ नाही फक्त मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे..

लेखक : राम ढेकणे   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!