शेती कट्टा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! खत कंपन्यांकडून खतांचे ग्रेडनुसार किंमत निश्चित, पहा…(Fertilizer)

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! खत कंपन्यांकडून खतांचे ग्रेडनुसार किंमत निश्चित, पहा आणि वाचा खतांच्या किमती 

शेतकरी रासायनिक खतांचा(Fertilizer) वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी करतात. परंतु बऱ्याचदा ऐन पिकांना खत देण्याच्या वेळेसच खताची टंचाई निर्माण होते व जे काही खते मिळतात ते वाढीव किमतीने शेतकऱ्यांना घ्यावे लागतात असे देखील प्रकार घडतात.


शेवटी शेतकऱ्यांना नाईलाजाने वाढीव दराने का होईना शेतीसाठी खते खरेदी करावी लागतात. परंतु यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरया वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे विक्री दर निश्चित केले आहेत. जर या विक्री दरानुसार विचार केला तर युरिया गोणी 266.50 रुपये तर सगळ्यात जास्त वापरले जाणारे डीएपी ची एक गोणी 1350 रुपये ला संयुक्त खते 1400 ते 1900 रुपये प्रति 50 किलो एक गोणी याप्रमाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहेत. खताच्या गोणी वर जी काही किंमत असेल त्याव्यतिरिक्त जास्तीची किंमत शेतकऱ्यांनी देऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.(Fertilizer)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!