शिक्षण कट्टा

government माझी कन्या भाग्यश्री योजने’चा असा घ्या लाभ!

(Take advantage of my daughter Bhagyashree Yojana!) स्री-शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी एक योजना सुरु केली. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ असं या योजनेचं नाव.. government

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा


पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जे पालक 1 वर्षाच्या आत नसबंदी करतात, त्या मुलीच्या नावावर राज्य सरकारकडून 50,000 रुपये जमा केले जातात. तसेच, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातात.

महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षात आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांत पालकाने नसबंदी करणं बंधनकारक आहे.
पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबच (BPL – वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत) या योजनेसाठी पात्र होते. नव्या नियमानुसार, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे. महाराष्ट्रातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे, असे कोणतेही कुटुंब या योजनेचा लाभ आता घेऊ शकतात government

या योजनेचा लाभ नेमकं कसा मिळतो? :

● ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’चा लाभ घेण्यासाठी पात्र पालकांना अर्ज करावा लागतो. योजने अंतर्गत मुलीच्या नावे किंवा तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यातच राज्य सरकार वेळोवेळी पैसे पाठवते.
● मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम काढता येते. अर्थात या रकमेवर मुलीला व्याजाचे पैसे मिळत नाहीत.
● भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान दहावी उत्तीर्ण, तसेच अविवाहित असायला हवी. एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो.
● लाभार्थी मुलगी व तिच्या आईच्या नावाने नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. दोघांना एक लाखांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ‘ओव्हर ड्राफ्ट’ मिळतो.
● योजनेंतर्गत मिळालेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

या योजनेसाठी पात्रता काय? :

● अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
● दोन मुलींनंतर नसबंदी करणाऱ्या पालकालाच ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’चा लाभ मिळतो.
● तिसरे अपत्य जन्मल्यास आधीच्या दोन्ही मुलींनाही योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!