मनोगतशिक्षण कट्टासंपादकीयसामाजिक कट्टा

विचाराची ताकद वाढणारे वर्तमानपत्र

शालेय जीवनात याची ओळख झाली असती तर आज मी एक वेगळया उंच्ची वर असतो..असो जे होत ते आपल्या चांगल्या गोष्टी साठी याच्यावर विश्वास ठेवून गेली खूप वर्ष काढले आहेत आणि येणारे वर्ष सुध्दा याच विचाराने काढावे लागेल..

रायगड ला असताना कॉलेज मध्ये अभ्यासिकामध्ये खूप जण वर्तमानपत्र वाचत असे,त्या वेळेस मी खूप त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.पण शेवटी एखादी वस्तू तूम्हाला भेटणार असेल तर ती कधी ना कधी तूमच्या पर्यंत येतेच ..त्याचप्रमाणे बहूतेक वर्तमानपत्र आणि माझी भेट होणारच होती त्याप्रमाणे २०१६ ला खरी ओळख वर्तमानपत्राशी माझी झाली. आणि तो प्रवास अजून सूरूच आहे..

माझे कमीत कमीत दोन तास वर्तमान पत्र वाचण्यात जाते.. वर्तमानपत्र हातात येण्याच्या अगोदर मला साधे आमदार कोण असतात,खासदार कोण असतात, आपला कारभार कोण चालवतो यांचा थोडासा सुध्दा गंध नव्हता..अस म्हणू शकता की मला वर्तमानपत्रामुळे जगाची ओळख झाली..जगाचा कारभार कसा चालतो,आपल्या शेजारी राष्ट्राबरोबर कशे संबंध आहेत..

जगामधील ,भारतामधील ,राज्यामधील चालूघडामोडी ची माहिती ,वेगवेगळया क्षेत्रातील करिअर च्या संधी मला याच वर्तमानपत्रामुळे माहीत झाल्या ..

परीक्षे पूरते वर्तमानपत्रे वाचायला सुरूवात केलती पण गेली ६ वर्ष माझ्या ज्ञानात प्रत्येक क्षेत्राची भर पडत गेली. आज वर्तमानपत्र घरी आले नाही तर मला करमत नाही..असे वाटते की माझ्या कडून आज काहीतरी विसरले आहे.

खूप काही वर्तमानपत्रातून मला शिकायला मिळाले. क्रिडा ,राजकीय ,सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक विषयाबद्दल सखोल माहिती मला वर्तमानपत्रातून मिळाली..

पण आज वर्तमानपत्र घेउन बसल्यावर आजूबाजूचे माझ्याकडे बघून हसतात..त्यांना वाटते सगळया बातम्या आता एक क्लिक वर उपलब्ध होत आहेत.आणि हा अजून वर्तमानापत्रातच रमला आहे..त्यांचे पण आता बरोबर आहे,खूप अशे चॅनल तसेच वेबसाइट तयार होत आहेत की घडल्या घडल्या एखादी बातमी तूमच्या पर्यंत येत आहे.पण याचे दुरूपयोग पण तेवढेच आहेत..एखादी बातमी वाचताना आपण दुसऱ्याच गोष्टी बघत बसतो आणि आपला वेळ जातो..पण ज्याचे स्वत:चे नियंत्रण मनावर आहे त्यांच्यासाठी खरेच अशा वेबसाईट आणि चॅनेल फायदेशीर ठरत आहेत..पण ज्यांचे आपल्या मनावर नियंत्रण नाही अशासाठी खरी बातमी बघायची लांबच राहते आणि हा कित्येक तास दुसऱ्याच गोष्टी बधत बसतो..त्यातच रमतो..

मला वर्तमानपत्रामुळे एक सवय चांगली लागली ती म्हणजे मी विचार करायला लागलो.प्रत्येक विषयावर मी आता सविस्तर विचार मांडू शकतो ..आपले स्वतंत्र मत मांडण्याची ताकद मला वर्तमानपत्रामुळेच मिळाली..

विचारामध्ये भर टाकण्याचे काम याच वर्तमानपत्रामुळे झाले..मी काय खूप ज्ञानी नाही बनलो पण स्वत:चे स्वतंत्र विचार मांडण्याची प्रेरणा यामुळेच मला मिळाली.

याचा अर्थ मी कोणत्याही सोशल मिडीयाला विरोध करत आहे असे होत नाही..कारण जेव्हा सोशल मिडीया नव्हते तेव्हा माझ्यासाठी ज्ञानांचे भंडार म्हणजे वर्तमानपत्र..

हो पण तूम्ही वर्तमानपत्र नाही वाचत असाल तर काहीही अडचण नाही पण सोशल मिडीया वरील बातम्या असेल किंवा लेख असतील ते तूम्ही अवर्जून वाचले पाहिजे ..त्याशिवाय तूम्ही विचार करू शकणार नाहीत..वैचारिक पातळी वाढवायची असेल तर कोणतेही एक वर्तमानपत्र किंवा सोशल मिडीया वरील वेबसाईट किंवा चॅनेल ला तूम्ही फॉलो केले पाहिजे.

मी दररोज सकाळ ,लोकसत्ता ,महाराष्ट टाईम्स ,दी हिंन्दू याचा आधार घेउन मी माझ्या विचारात भर टाकत आहे.वर्तमानपत्र वाचून माझ्यामधील आत्मविश्वास वाढत आहे.मला नविन नविन गोष्टी समजत आहेत..मी या समाजाशी जोडलेलो आहे याची जाणीव मला होत आहे.मला एक वेगळयाच प्रकारचा आनंद मिळत आहे..समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना माझ्या मनात निर्माण होत आहे.मी एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करत आहे वर्तमानपत्र वाचून ..देशाबद्दल प्रेमाची भावना माझी वाढत आहे.मला माझ्या संस्कृतीची ओळख याच वर्तमानपत्रातून होत आहे. माझा देश कसा आहे हे मला याच वर्तमानपत्रातून समजत आहे..त्यामुळे मी आयुष्यभर वर्तमानपत्राला सोबत ठेवणार मग तो ऑनलाईन असो की ऑफलाईन असो.तूम्ही पण तूमच्या विचारात भर घालण्यासाठी नक्की वाचत जावा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!