टीव्ही-सिनेमा कट्टा

bollywood रणबीर आणि संजय दत्तच्या ‘शमशेरा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

bollywood अखेर रणबीर आणि संजय दत्तच्या ‘शमशेरा’च्या ट्रेलरची प्रतिक्षा संपली आहे. रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भुमिका असलेला बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा धमाकेदार ट्रेलर पाहुन असे बोलले जात आहे की, ‘शमशेरा’ ‘केजीएफ’ आणि ‘आरआरआर’ सारख्या चित्रपटांना टक्कर देईल. रणबीर कपूरने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी तयार आहे. तर संजू बाबा निगेटिव्ह भुमिकेत दिसणार आहे.

अखेर रणबीर आणि संजय दत्तच्या ‘शमशेरा’च्या ट्रेलरची प्रतिक्षा संपली आहे ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेलरमध्ये रणबीर कपूरचा धमाकेदार लुक आणि अंदाजाने चाहत्यांच्या अंगावर काटा येत आहे. ‘संजू’ च्या 4 वर्षांनंतर रणबीर कपूरने धमाकेदार कमबॅक केलम आहे. डाकूच्या भुमिकेत त्याच्या लुकला १०० पैकी १०० मार्क दिले जाऊ शकतात. ट्रेलरमध्ये ज्याप्रमाणे त्याची एंट्री झाली ती लाजवाब आहे. संजय दत्तबद्दल सांगायचे झाल्यास त्याने पहिले देखील निगेटिव्ह भुमिका केली आहे. नुकतच ‘केजीएफ 2’ मध्ये देखील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं होत. आता ‘शमशेरा’ मध्ये दरोगा शुद्ध सिंहच्या भुमिकेत तो दिसणार आहे. bollywood

वाणी कपूरबद्दल सांगायचे झाल्यास ती सोना नावाच्या नाचणारीची भुमिका साकारत आहे. ‘शमशेरा’ आणि सोनाची प्रेमकहानी या ट्रेलरमध्ये दिसत आहे. रणबीर-वाणी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करत आहे.चित्रपटाची पुर्ण शूटिंग लडाखमध्ये केली आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित यश राज फिल्म्स बॅनर खाली निर्माण होत आहे. वाणी कपूर, रणबीर कपूर, संजय दत्त शिवाय चित्रपटात आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि त्रिधा चौधरी देखाल दिसणार आहेत. 22 जुलैला शमशेरा रिलीज होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!